स्नेहालय संस्था अहिल्यानगर

कै. गोपालभाई गुजर यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्त अहिल्यानगर येथील झेन इलेक्ट्रिक कंपनीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

अहिल्यानगर- झेन इलेक्ट्रिक कंपनी,एम.आय.डी.सी येथे कै. गोपालभाई गुजर यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.

 

 

यावेळी शिबिराचे उद्घाटन स्नेहालयचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी आणि उद्योजक  झेन इलेक्ट्रिकचे संस्थापक श्री.मिलिंद कुलकर्णी, यांच्या शुभहस्ते तर कै.गोपालभाई गुजर यांच्या स्मृतीला वंदन करून पार पडले.यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे प्रेसिडेंट श्री.कुणाल कोल्हे आणि सेक्रेटरी श्री.सुनिल कटारिया, आमी संघटनेचे अध्यक्ष श्री. जयद्रथ खाकाळ, श्री. संजय बंदिष्टी, श्री.ईशान कुलकर्णी, श्री.मिहीर कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

 

 

उद्योजक श्री. राजीव गुजर यांचे वडील कै. गोपालभाई गुजर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मागील सलग ११ वर्षांपासून झेन इलेक्ट्रिक कंपनी येथे रक्तदान शिबीर आयोजित केले जात आहे. यावेळी रक्तदान शिबिरात एकूण १०५ ब्लड बॅग्सचे संकलन करण्यात आले. यासाठी साईसेवा ब्लड सेंटर आणि जनकल्याण ब्लड सेंटर यांचे सहकार्य लाभले. स्नेहालय संचालित केअरिंग फ्रेंड हॉस्पिटलद्वारा मोफत आरोग्य तपासणीचेही आयोजन करण्यात आले होते. एकूण ७३ जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झेन इलेक्ट्रिकचे श्री. दिपक बनकर, श्री.निलेश गुगळे व सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष योगदान दिले.

 

 

 

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!