
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
नेवासा -नेवासा तालुक्यातील ‘एका सरपंच’ व ‘ग्रामसेवकांने’ ग्रामपंचायतीकडून ‘नो ऑब्जेशन सर्टिफिकेट’ देण्यासाठी एका पेट्रोल पंप चालकांस संबंधित पेट्रोल पंप बंद करण्याची धमकी देवून दमदाटी करून “खंडणी” मागितली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण नेवासा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे खंडणी मागणारा सरपंच व ग्रामसेवक कोण?? आहे याची माहिती अध्यापही गुलदस्त्यात आहे.
मागील दीड महिन्यापासून संपूर्ण राज्यभरात बीड जिल्ह्यातील मस्साजोग खंडणी व हत्या प्रकरण चांगलेच गाजलेले आहे. याच दरम्यान मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कथित हत्येच्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र राज्यात उमटत आहे.बीड जिल्ह्यातील एका मोठ्या पवनचक्कीच्या कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीमुळेच मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली असावी अशी संभावना संपूर्ण महाराष्ट्रसह राज्यभरात उपस्थित केली जात आहे.या घटनेचा तपास अजूनही सुरु असून त्या गुन्ह्यातील तब्बल सात आरोपीवर माकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण तापले असताना नेवासा तालुक्यात नुकताच असाच एक खंडणीचा प्रकार घडला आहे या प्रकरणाची चांगली चर्चा आता संपूर्ण नेवासा तालुक्यात रंगलेली आहे नेमकी संबंधित पेट्रोल पंप चालकाकडून खंडणी मागणारा सरपंच कोण व ग्रामसेवक कोण याची माहिती माध्यमांच्या समोर लवकर येणार आहे.
नेवासा तालुक्यातील या घडलेल्या खंडणीच्या प्रकरणात सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर- संभाजीनगर महामार्गावर नामांकित कंपनीचा एक पेट्रोल पंप असून त्या मोठ्या पंप मालकाला ग्रामपंचायती मधुन न हरकतीचा दाखला (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या करा व्यतिरिक्त अजूनही बेकायदेशीर व अतिरिक्त रक्कमेची मागणी नेवासा तालुक्यातील “एका सरपंच व ग्रामसेवकाकडून” करण्यात आली असल्याचा खळबळ जनक प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर त्या सरपंच व ग्रामसेवकाने पंप चालकाला थेट धमकी व दमदाटी करून मागितलेली सदरील रक्कम वेळेवर दिली नाही तर ‘तुमचा पेट्रोल पंप बंद पाडू ‘अशी धमकी देखील त्या सरपंच व ग्रामसेवकाने पेट्रोल पंप मालकास दिली असल्याची माहिती मालकाने दिली आहे. अहिल्यानगर- संभाजीनगर मार्गावर असलेल्या पेट्रोल पंप चालकाने युनियन व गावकऱ्यांच्या एका शिष्टमंडळासोबत याप्रकरणी लवकरच पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे पोलीस प्रशासनाकडून कारवाईचे सूत्र तात्काळ फिरल्यास या संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावरील नेमके पेट्रोल पंप कोणाचा? तो खंडणी मागणारा सरपंच व ग्रामसेवक कोण ही खंडणी कोणाच्या माध्यमातून कोणाला मागण्यात आली? याचे सर्व सविस्तर उत्तर कारवाईच्या माध्यमातून कळून येईलच.
