अहिल्यानगर जिल्हा

जळगावमधील गरजू कुटुंबांची दिवाळी गोड; आनंदाच्या शिध्याचे वाटप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा उपक्रम

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – दीपावलीचा सण प्रत्येकाच्या घरात आनंदाने साजरा व्हावा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचीही दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक भावनेतून राहाता तालुक्यातील जळगाव येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत गरजवंत कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. शेतकरी सेवा केंद्र आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाचे नेते मुकुंद सिनगर व मच्छिंद्र भवार यांच्या सहकार्याने राहाता तालुक्यातील गरजू कुटुंबांना दीपावलीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत जळगाव येथे राजमुद्रा युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत गरजू कुटुंबांना शिध्याचे वितरण केले.

 

सणासुदीच्या काळात समाजातील गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे आणि त्यांनाही दीपावलीचा सण उत्साहात साजरा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात राजमुद्रा युवा प्रतिष्ठानने सक्रिय सहभाग नोंदविला.

 

यावेळी राजमुद्रा युवा प्रतिष्ठानचे अमोल चौधरी, राहुल चौधरी, निखिल चौधरी, सचिन चौधरी, भारत गुंजाळ, दत्ता चौधरी, महेश शिनगारे, हर्षल शिंदे, गणेश वैराळ, देविदास गायकवाड, किशोर पांढरे, राजू कापरे, गोरख शिंदे, किशोर वैद्य, वामन कापरे, रोहित लाहुंडे, महेश वाघ, पप्पू कोल्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!