अहिल्यानगर जिल्हा

पद्मश्री डॉ. विखे पाटील सैनिक स्कूलचे जलतरण आणि वॉटर पोलो स्पर्धेत कॅडेट्सची चमकदार कामगिरी;पाच कॅडेट्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी- लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल येथील कॅडेट्सनी अहिल्यानगर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील जलतरण व जलक्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शाळेच्या पाच कॅडेट्सची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

 

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या कॅडेट्समध्ये साईराज अदनाक, राजवर्धन पाटील, श्रेय गांधी, अर्णव पळशीकर आणि अंश काळे यांचा समावेश आहे. कॅडेट्सनी विविध जलतरण प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. 

 

दरम्यान, विभागीय स्तरावरील वॉटर पोलो स्पर्धेत पीव्हीपी सैनिक स्कूलच्या अहिल्यानगर संघाने रौप्यपदक पटकावत द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत पुणे शहर संघाने सुवर्णपदक, अहिल्यानगर संघाने रौप्यपदक, तर पुणे ग्रामीण संघाने कांस्यपदक मिळविले.

वॉटर पोलोमधील उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर राजवर्धन पाटील आणि अंश काळे या दोन कॅडेट्सची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वॉटर पोलो निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे सैनिक स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे. 

 

 या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे डॉ. महेश खर्डे, कर्नल सुभाष घोडागेरी प्राचार्य श्री. राजेश मगधाडे यांनी सर्व यशस्वी कॅडेट्सचे अभिनंदन केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!