(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
अहिल्यानगर- नेवासा तालुक्यातील सुरेशनगर ग्रामपंचायतीचे सरपंच,ग्रामसेवक, शिपाई यांच्या संगणमताने तब्बल ५ लाख १७ हजार ६४९ रुपयांचा मोठा गैरव्यवहार झाला आहे.नेवासा तालुक्यातील हे पहिलेच प्रकरण आहे .दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्थरावर केली जावू लागली आहे शासनाने गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीला चुना लावून त्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग केला असून सर्वत्र नेवासा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराच्या चर्चेला उधान आले आहे.
सार्वजनिक विहिरीचा गाळ काढणे व जाळी बसणे व पाईपलाईन दुरुस्ती कामी कुठलेही काम न करता १,७२,३००/- लक्ष रुपयेचा भ्रष्टाचार तसेच दीड वर्षात केलेली स्ट्रीट लाईट खरेदी,दुरुस्तीमध्ये एकूण ३,०५,८४९/- लक्ष रुपयेचे खरेदी व दुरुस्ती बेकायदेशीर पणे दाखवून लाखोंचा रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे तर शिवम नांवे काहीही काम न करता बेकायदशीरपणे काढलेले १८,००० हजार रुपयेचा भ्रष्टाचार त्याचप्रमाणे वाचनालय कलर कामी वाचनालयाला कलर न देता बेकायदेशीर पणे काढलेले २१,५००हजार रुपयांचा भ्रष्टाचार केलेला असल्याची बाब उघडकीस आली आहे.या बाबत अमृत सुरेशराव उभेदळ,ग्रामपंचायत सदस्य विकास पांडुरंग उभेदळ, यांच्यासह ग्रामस्थांनी या भ्रष्टाचाराची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे तक्रार केली आहे.लाखोंच्या घोटाळ्याची थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार केल्याने अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे व पंचायत समिती नेवासा येथील अधिकारी ऍक्शन मोडवर आलेले आहे अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती या समितीने ग्रामपंचायतची सर्व तपासणी करून अवहाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केलेला आहे.
सुरेशनगर (ता.नेवासा) ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारावर प्रकाश टाकणाऱ्या प्रेस व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांवर सरपंचाच्या नातेवाईकांकडून दबावतंत्र करण्याचा प्रयत्न..!
“सुरेशनगर (ता.नेवासा) ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारातील दोषींना वाचवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या गोष्टींचा उपयोग केला जात आहे.सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकणाऱ्या प्रेस व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना महिला सरपंचाच्या काही नातेवाईकांकडून वैयक्तिकरीत्या टार्गेट करून त्रास दिला जात आहे.डिजिटल व प्रिंट प्लॅटफॉर्मवर ग्रामपंचायतीच्या लाखोंच्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर संबंधित सुरेशनगर ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराच्या बातम्या हटवण्यासाठी अथवा बातम्या प्रसिद्ध न करण्यासाठी महिला सरपंचाच्या पतीच्या एका नातेवाईकाकडून विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.या भ्रष्टाचाराचे मुळ खोलवर रोवले गेले आहे प्रसार माध्यमावर बातम्या प्रसिद्ध होवू नये यासाठी अनेक व्हाईट कॉलर पुढारी पुढे येत आहे ग्रामपंचायतीचा घोटाळा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे.ग्रामपंचायतस्तरावर भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक आदी पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या नातेवाईकांना मध्यस्थी घालून किंवा राजकीय दृष्ट्या दबाव आणला जातो यामुळे जेणेकरून ग्रामपंचायत मध्ये केलेला लाखोंचा भ्रष्टाचार लोकांसमोर उघड होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.अनेकदा घोटाळ्यामध्ये सहभागी सरपंच ग्रामसेवक तसेच इतर नातेवाईक व पदाधिकाऱ्यांकडून पत्रकारांना बातमी करू नये यासाठी धमकावले जात आहे.
ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची स्वतःला वाचविण्यासाठी अक्षरशः धावपळ..!
एवढ्या पैशाचा भ्रष्टाचार तर केला पण त्याची भरपाई कोण करणार..? हाच प्रश्न सुरेशनगर ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या सरपंच ‘घोटाळेला’ आणि त्यांच्या साथीदारांना पडलेला आहे यामुळे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची स्वतःला वाचविण्यासाठी अक्षरशः धावपळ उडाली आहे शासन आपल्यावर कोणत्याही क्षणी कारवाई करणार असल्याचे ‘घफलेबाजाना’ कळून चुकले आहे गावाच्या विकासासाठी शासनाने दिलेल्या निधीचा गैरवापर करून ग्रामसेवकाच्या व शिपायाच्या मदतीने महिला सरपंचांने चक्क ‘निधीचा मलीदा’ खाल्ला आहे लाखों रुपयांचा आर्थिक घोटाळा असून’ कुंपणाने शेत खाल्ले आहे. या भ्रष्टाचारा संबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ दाखल घेतलेली आहे घडलेल्या गैरव्यवहाराची अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून चौकशी झालेली असून लवकरच दोषींवर कारवाई केली जाणार आहे या घबरटीने घोटाळेबाज सरपंच, ग्रामसेवक, शिपाई यांची जणू एकप्रकारे कोंडी झालेली आहे.मुख्य गोष्ट म्हणजे या ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच कार्यरत आहे परंतु त्यांचे पती ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे याकारणास्तव हा भ्रष्टाचाराचा. मुद्दा चांगला गाजणार आहे.ग्रामपंचायतीमध्ये घोटाळे करणारे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांना कोणाचेही घेणे देणे नसून ग्रामपंचायतच्या पैशाने स्वतःचे पोट भरण्याचा धंदा त्यांनी सुरू केलेला आहे.
सुरेशनगर ग्रामपंचायतीच्या विरोधात सबळ पुरावे असूनही अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यास विलंब होत आहे.
“सुरेशनगर (ता.नेवासा) ग्रामपंचायतीची सर्व दप्तर तपासणी व तक्रारींची तसेच कॅशबुकची ग्रामपंचायत कडून झालेल्या सर्व गैरव्यवहारांची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तंतोतंत माहिती घेतलेली असून यात जवळजवळ ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झालेले आहे परंतु; प्रशासनानने भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच, शिपाई व ग्रामसेवकावर अजूनही कारवाई केली नाही असे तक्रारदार अमृत सुरेशराव उभेदळ यांनी सांगितले.अधिकाऱ्यांनी कोणत्याही अदृश्य शक्तीच्या दबावाखाली राहू नये ग्रामपंचायतीच्या विरोधात संबंधित पुरावे असूनही कारवाई करण्यास चालढकलपणा करत विलंब होत असल्याने ग्रामस्थांतुन मोठा संताप व्यक्त होत आहे. सुरेशनगर ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अधिकारी यांचा कुठलाही वचक नसल्याचा गैरफायदा घेवून ग्रामपंचायतीला शासनाकडून मिळालेल्य विविध विकास कामांच्या निधीमधून डल्ला मारला आहे. एवढेच नव्हे तर थेट १५ व्या वित्त आयोगांच्या निधीतून भ्रष्टाचार करण्यासाठी नामी शक्कली लढवली असून या मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायत हद्दीत काम झाल्याचे भासवले गेले परंतु ते काम प्रत्यक्षात झालेच नाही तरी ग्रामसेवकाला हाताशी धरून बोगस बिले काढलेले आढळून आले आहे असे तक्रारदार अमृत सुरेशराव उभेदळ ग्रामपंचायत सदस्य विकास पांडुरंग उभेदळ व ग्रामस्थांनी सांगितले असून सुरेशनगर ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची लढाई आम्ही कायदेशीररित्या लढणार आहे आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे सुरेशनगर ग्रामपंचायत गैरव्यवहारातील सरपंच,ग्रामसेवक, व शिपाई सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी कोणाचीही गय करू नये..- अमृत सुरेशराव उभेदळ, तक्रारदार