
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – ज्ञान साई हेल्थ क्लब, श्रीरामपूर यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हास्तरीय खुल्या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १४ ते १९ वर्षे वयोगटातील २०० हून अधिक मुलींनी सहभाग घेतला होता. प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी च्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत यश संपादन करत सात मुलींनी विविध पदके मिळविली केले अशी माहीती प्राचार्या सौ.भारती कुमकर यांनी दिली.
यास्पर्धेत १४ वर्षे वयोगटात गायञी तोरणे,रोशनी माने,१७ वर्षे वयोगट भक्ती वाघ,श्रावणी घोगरे,सृष्टी जाचक आणि मृणाली माने,१९ वर्षवयोगटात सिध्दी सोंगाडे यांनी विशेष यश संपादन केले.त्यांना स्विमिंग कोच सुचिञा तांबे,क्रिडा संचालिका विद्यादेवी घोरपडे,हाॅकी कोच कल्पना कडू यांचे मार्गदर्शन लाभले.प्रवरा शैक्षणिक संकुलामध्ये दर्जेदार शिक्षणाबरोबरच खेळायलाही विशेष महत्त्व दिले जाते. सर्वच खेळामध्ये संस्थेचे विद्यार्थी हे कायमच आघाडीवर राहिले आहेत. संस्थे अंतर्गत तीन जलतरण तलाव असल्याने जलतरण स्पर्धेतही यशस्वी ठरत आहे.
उत्तम कामगिरीबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी श्री. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे अतांत्रिक संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्राचार्या सौ.भारती कुमकर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
