प्रवरा शिक्षण संस्था

छत्रपती शाहू महाराजांनी जगभरात आपल्या कार्यातून आदर्श निर्माण केला – डाॅ.उत्तमराव कदम 

प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती समारंभाचे आयोजन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी – छत्रपती शाहू महाराजांनी जगभरात सर्वप्रथम आरक्षणाचे धोरण राबविले. आरक्षण धोरणाची स्वतःच्या कृतीने अंमलबजावणी करून तसेच निवासी वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात केलेल्या मोठ्या कार्यामुळे ते संपूर्ण जगभरात आपला आदर्श निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे प्रतिपादन प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी केले आहे. 

 

 

लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेत आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती समारंभात प्रा.डॉ.कदम बोलत होते.  

 

यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.दिलीप महाले, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश दळे , कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आशिष क्षीरसागर ,सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.रमेश जाधव यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रविण गायकर, प्रा.संदीप पठारे, व प्रा. शुभम मुसमाडे आदींनी प्रयत्न केले. 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!