(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
सोनई-प्रतिनिधी राहुल राजळे
अहिल्यानगर: (ता.२१) – श्री.शनीश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शनिश्वर विद्या मंदिरची गुणवत्तेची उज्वल परंपरा आहे ती कायम राखण्यासाठी शिक्षक विद्यार्थी यांनी प्रयत्न करावे.संस्थेच्या वतीने सर्वोतपरी सहकार्य केले जाईल.विविध क्षेत्रामध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे या उदात्त हेतुने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचे काम करते असे प्रतिपादन उदयन गडाख यांनी केले.
सोनई (ता.नेवासा) येथील श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर,सोनईचे 3 दिवशीय स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण गुरुवार (ता.१९) ते शनिवार (ता.२१) २०२४ रोजी प्रदर्शन,गुणदर्शन व पारितोषिक वितरण मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी उदयन गडाख बोलत होते.या प्रसंगी व्यख्याते ह.भ.प.सुनील कोळपकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विषद केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव उत्तमराव लोंढे होते.याप्रसंगीसंस्थेचे सदस्य उदयराव पालवे,मुळा बॅंकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब निमसे स्कूल कमिटी सदस्य व पत्रकार विनायक दरंदले, पी.डी.मोरे द्वारका कुमावत,शुभांगी बडे मॅडम कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यमुना इखे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या इंदुमती खंडागळे यांनी केले. उपप्राचार्य एकनाथ गवळी यांनी स्वागत केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक शिवाजीराव कर्जुले, किशोर मुंगसे ,संजय पुंड,दादा औटी, बी.एस.दरंदले,प्रदीप डांगे अर्जुन दराडे आदींनी प्रयत्न केले.
