महाराष्ट्रशैक्षणिक

न्यू इंग्लिश स्कूल चितळीचा दहावीच्या निकालात दैदिप्यमान यश;महाविद्यालयाचा ९६.३९ टक्के निकाल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यातील चितळी येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.महाविद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ९६.३९ टक्के लागल्याने सर्वत्र विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चितळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समर्थ नितीन थोरमोठे याने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. रितेश दिनकर उफाडे याने ९३.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर समृद्धी बाबासाहेब चौधरी हिने ९२.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ६ विद्यार्थी असून, ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७ आहे. तसेच विशेष प्राविण्य श्रेणीत २२ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ४२ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ३० विद्यार्थी तर पास श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि संस्थेचे योगदान महत्त्वाचे ठरल्याची भावना विद्यालय प्रशासनाने व्यक्त केली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री शिरसाट एन. एन, पर्यवेक्षिका सौ.सातव ए. एस, वर्गशिक्षिका सौ.यशवंत एन. एन., श्रीमती पाटील एस. एस. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी चितळी व जळगाव येथील ग्रामस्थांनीही कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!