
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा इयत्ता पहिलीत १८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या इंग्रजी माध्यम वर्गात पाच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून पंचक्रोशीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब चौधरी, बाळासाहेब चौधरी, विजय चौधरी, डॉ. गोरख चौधरी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत प्रकाश वाघ, उपाध्यक्षा आश्लेषा चौधरी, सदस्य वैशाली आदमाने, सुरेखा गुंजाळ, संतोष आदमाने, जया चौधरी, फिरोज शेख, मंजुषा शिंदे, महेश राशिनकर, उषा साळुंके, ललिता चौधरी, अरुण गायकवाड, अंगणवाडी सेविका आरती वैद्य, शीतल चौधरी, शेख ताई,यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी वाव्हळ, विस्तार अधिकारी घोरपडे तसेच केंद्रप्रमुख चंदा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापक नारायण जाधव यांनी प्रास्ताविकात शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण, विविध शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शिक्षक कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका मंगल भडांगे यांनी शासनाच्या विविध योजना, शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा आणि उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा विकास साधला जात असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठकाजी खेमनर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मारुती खरात यांनी मानले.
जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतुन अनेक गुणवंत विद्यार्थी घडले असून शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमुळे यंदाचा प्रवेशोत्सव विशेष लक्षवेधी ठरला असून गुणवत्तापूर्ण शिक्षण, विविध उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीमुळे शाळेकडे पालकांचा वाढता कल दिसून येत आहे.




