नेवासा तालुकाराष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीर

श्री.ज्ञानेश्वर महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबिरात आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

प्रतिनिधी – राहुल राजळे

 

 

नेवासा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व मुळा एज्युकेशन सोसायटीचे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिवेणीश्वर हांडीनिमगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या भूमिकेतून तरुणांमध्ये जन जागृती करण्यात आली.तसेच रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा असणारा तुटवडा व त्यामुळे होणारे मृत्यू याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

 

शिबिरामध्ये रोहित महेर,पवकुमार आल्हाट,मंदार लष्करे, वैभव चिमणी,आदित्य वरणे, कल्याण गर्जे ,विशाल घोलप ओमकार लष्करे गौतम कुदळे ,गवळी शुभम गवळी, मयूर भणगे, विशाल हापसे ,वेदांत बोलके , पवन भुसारी, अक्षय वरगुडे , सुनील दळे या 18 स्वयंसेवकांनी रक्तदान केले यानंतर दुपारच्या सत्रात सर्व स्वयंसेवकांची हिमोग्लोबिन व एच आय व्ही तपासणी करण्यात आली यासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालय येथील टीम यांनीही तपासणी केली या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. नवनाथ आगळे सहकार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश गारूळे सहकार्यक्रम अधिकारी डॉ.कार्तिकी नांगरे यांनी कष्ट घेतले याप्रसंगी प्रा.दरंदले स्वप्नाली व प्रा.जाधव ऋतुजा या उपस्थित होत्या.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!