Uncategorized

श्री.गणेश विद्यालयाला 1994-95 बॅचकडून दोन लाख रुपयांचा निधी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – गणेशनगर (ता.राहाता) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.गणेश विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सायकल स्टॅन्डसाठी सन 1994-95 च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत दोन लाख रुपयांची देणगी गोळा केली आहे. दिनांक 25 जून 2025 रोजी सचिन वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली जावेदभाई पठाण, मनोजभाऊ ताटपुरकर, नंदूभाऊ नळे, वाल्मीकभाऊ गाढवे यांनी एकत्र येऊन विद्यालयासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला.

 

माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृशाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ‘ही शाळा आपल्याला घडवणारी ज्ञानमंदिर आहे तिचे आपण काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून सायकल स्टॅन्डसाठी आर्थिक मदतीचा निर्णय घेतला. गोळा केलेल्या निधीतून लवकरच बंदिस्त सायकल स्टॅन्ड उभारण्यात येणार आहे, ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुविधायुक्त स्टॅन्ड मिळवण्यासाठी होणार आहे.

 

या उपक्रमात शाळा कमिटीचे चेअरमन रावसाहेब पांडुरंग गाढवे, अनिल काका गाढवे, अण्णासाहेब कोटे, दादासाहेब गाढवे, संदीपभाऊ गाढवे, जयाभाऊ काले शेठ, विजय सदाफळ यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नातून ही योजना यशस्वीपणे कार्यान्वित होणार आहे.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.वसावे के. के. यांनी सर्व माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, असे ते म्हणाले.

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!