नेवासा तालुकाशैक्षणिक

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांची समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालयास भेट

शिक्षकांशी संवाद साधत शैक्षणिक उपक्रमांचे केले कौतुक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम सहकार्याचे आश्वासन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी – राहुल राजळे 

 

नेवासा – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी बुधवारी, दिनांक २१ मे २०२५ रोजी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा विद्यालय, उस्थळ दुमाला (ता. नेवासा) येथे भेट दिली.

यावेळी त्यांनी विद्यालयातील शिक्षकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली आणि या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे उपक्रम खरोखरच दिशादर्शक आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.त्यांनी विद्यालयाच्या क्रीडांगणाचीही पाहणी केली. विद्यालय, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भविष्यात सर्वोत्तम सहकार्य करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक रावसाहेब सोनसळे यांनी आमदार सत्यजित तांबे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच शिक्षक देविदास वैरागर यांचा सेवानिवृत्ती निमित्त आमदार तांबे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमास किशोर भनगे, प्रवीण कहांडाळ, संजय चिंधे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!