प्रवरा शिक्षण संस्थाराष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबीरशैक्षणिकसामाजिक

पुणतांबा महाविद्यालयाच्या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे जळगाव (ता. राहाता) येथे आयोजन!

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

राहाता – प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पुणतांबा यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन (दि.१५ ते २१) जानेवारी २०२५ या कालावधीत मौजे जळगाव  (ता.राहाता) येथे  आयोजित केले जाणार आहे अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सुरेश शिंदे व प्राचार्य डॉ.अमीन सय्यद यांनी दिली.

 

राहाता तालुक्यातील जळगाव येथे (दि. १५ ते २१) या कालावधीत होत असलेल्या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन गुरुवार १५ जानेवारी रोजी दुपारी (१२.३०) वा संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व सरपंच मा श्री.शिवाजी साबदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सौ. मीराताई काकडे, महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री विजय धनवटे,श्री.गंगाधर चौधरी,श्री.संपतराव चौधरी,पत्रकार श्री.संजय जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शिबिराचा समारोप (दि.२१) जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा मा. श्री.राजेश परजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत,उपसरपंच श्री.दिलीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व महाविद्यालयीन विकास समिती सदस्य डॉ.धनंजय धनवटे,श्री. अण्णासाहेब सयाराम चौधरी, भाऊसाहेब पिरताजी चौधरी, कोल्हार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिभाऊ आहेर ग्रामविकास अधिकारी गोटीराम मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 

 

या शिबिरात कार्यक्रम अधिकारी डॉ.सुरेश शिंदे यांचे राष्ट्रीय सेवा योजनेत युवकांची भूमिका,अहिल्यानगर स्नेहालयचे श्री प्रवीण कदम यांचे बालविवाह तरुणाची जबाबदारी व भूमिका,डॉ.सुनील खिल्लारी हे ऐतिहासिक गड किल्ला संवर्धन,विवेक कर्डीले व सागर नागरे हे आजचा युवका पुढील आवाहने, प्रा.अभय सिनारे युवक व प्रसार माध्यम आदी विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

 

या शिबिरात बाल विवाह व महिलांचे आरोग्य, डिजिटल साक्षरता, पर्यावरण जनजागृती,लोकसंख्या नियंत्रण,मतदार जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे तसेच सदर शिबिरास यशवंत आणासाहेब चौधरी, बाळासाहेब गंगाधर चौधरी, सुरेश राजाभाऊ औताडे,नारायण त्रिबक चौधरी,शंकर भागवत चौधरी,राजेंद्र गायकवाड, मच्छिन्द्र चंद्रभान चौधरी,बापूसाहेब लक्ष्मण चौधरी,विजय बबन चौधरी, किसन भिवसेन चौधरी, जि.प.शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. गोरक्षनाथ चौधरी उपाध्यक्ष शाम चौधरी मुख्याध्यापिका संगीता आहिरे व सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ.सय्यद ए.एस.यांनी दिली.

 

 

जाहिरात

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!