अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

रोजगारासाठी कौशल्यांसोबत जिद्द आणि आत्मविश्वास गरजेचा – माजी आ.स्नेहलता कोल्हे

संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकमध्ये ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’; १५ कंपन्यांचा सहभाग, ५०० युवक-युवतींची नोंदणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – युवक-युवतींनी शिक्षण घेत असताना रोजगाराच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत. रोजगार मिळविण्यासाठी कौशल्यांसोबतच जिद्द आणि आत्मविश्वासही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या ‘सेवासंकल्प’ अभियानांतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी स्नेहलता कोल्हे बोलत होत्या.

यावेळी कोपरगावच्या नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, प्राचार्य ए. आर. मिरीकर, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे, महाकुंभाचे समन्वयक अमोल घोलप, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच रोजगारासाठी आलेले युवक-युवती उपस्थित होते.

स्नेहलता कोल्हे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना रोजगार महाकुंभासारख्या उपक्रमांमधून युवकांना विविध संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. युवकांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत स्वतःच्या कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.युवतींना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, “परिस्थितीसमोर हताश होऊ नका. रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी लढत राहा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवा.”

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता आणि क्षमता आहे. योग्य कौशल्य, संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास हे विद्यार्थी देशासह परदेशातही आपले स्थान निर्माण करू शकतात, असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संधी मिळाव्यात या उद्देशाने संजीवनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. रशिया, जपानसह विविध देशांमध्ये संजीवनीचे विद्यार्थी कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.या रोजगार महाकुंभात विविध क्षेत्रातील १५ कंपन्यांनी सहभाग घेतला असून सुमारे ५०० युवक-युवतींनी नावनोंदणी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आय. के. सय्यद यांनी केले, तर आभार प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी मानले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!