अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

कोपरगाव बस आगारात माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची अचानक पाहणी; प्रवाशांच्या गैरसोयीवर अधिकाऱ्यांना खडसावले

बससेवा, स्वच्छता, महिला सुरक्षा आणि मूलभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – आगारातील बससेवा, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता आणि महिला सुरक्षेची पाहणी करण्यासाठी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी अचानक आगाराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक बस नादुरुस्त असल्याने प्रवाशांसह विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी आगारातील अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव तसेच प्रवाशांसाठीच्या मूलभूत सोयींचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी हिरकणी कक्ष कुलूपबंद असल्याचे आढळले. तसेच बसस्थानकाच्या पूर्व बाजूस मैलमिश्रित पाणी उघड्यावर वाहत असल्याचे निदर्शनास आले.महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानक परिसरात टवाळखोरांकडून होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक कारवाई करून बंदोबस्त वाढवावा, अशा सूचना आ. कोल्हे यांनी केल्या.ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना बस खोळंब्यामुळे तासनतास गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बस दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्यास वरिष्ठ स्तरावर तातडीने मागणी करावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.नागरिकांची गैरसोय होता कामा नये. प्रवासी, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांना सुरक्षित व सन्मानजनक सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मी पुन्हा आगाराला भेट देणार असून, तोपर्यंत आज निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींमध्ये सुधारणा झालेल्या दिसल्या पाहिजेत,” असे आ. स्नेहलता कोल्हे यांनी स्पष्ट केले.

बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत, बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू करावेत, प्रवाशांसाठी पंख्यांची व्यवस्था सुरळीत ठेवावी तसेच स्वच्छता आणि महिला सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आरोग्य सभापती वैभव आढाव, महिला मोर्चा शहराध्यक्ष अनिता गाडे, अविनाश पाठक यांच्यासह प्रवासी नागरिक उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!