अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन आणि जलस्रोतांचे बळकटीकरण करावे- पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

राहाता तालुकास्थरीय टंचाई आढावा बैठक मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – टंचाई निवारण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच पाणी स्रोताचे बळकटीकरण मध्ये, दुरुस्ती, खोलीकरण करावे, तसेच ग्रामविकास व महसूल, महावितरण आणि पाणीपुरवठा कृषी आणि पशुसंवर्धन या विभागाने समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.राहता येथे तालुकास्तरीय टंचाई आढावा बैठकीचे आयोजन कुंदन हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी शिर्डी नगराध्यक्ष जयश्री थोरात, उपनगर अध्यक्ष अभय शेळके, राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी , प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधीर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त उमेश पाटील, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड,यांच्यासह कृषी, पशुसंवर्धन जलसंपदा, महावितरण व सर्व विभागाचे तालुकास्तरीय विभाग प्रमुख, शेतकरी , नागरिक,उपस्थित होते.पाणी टंचाईच्या निवारणार्थ विविध पाण्याचे स्रोत बळकटीकरण करण्यासाठी कालवे , सिंचन विहिरी, नाले आणि बंधाऱ्याच्या दुरुस्ती करून पाण्याची पाणी गळती थांबावे यासाठी स्वच्छता करण्यात यावी. यासाठी जलसंपदा विभागाने पुढाकार घेतलेला आहे .यात महावितरण कंपनी आणि संबंधित यंत्रणेने पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा. वारंवार येणाऱ्या शेजाऱ्याच्या विजेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी योग्य वीजप्रवाह करण्यावर तांत्रिक बाबतीत दक्षता घ्यावी.लग्न सोहळे व विविध उत्सवातील खर्च कमी करावा-

राज्यातील टंचाईची परिस्थिती पाहता लग्न सोहळे व विविध उत्सवावर होणारा खर्च कमी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.कृषी विभागाने कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर आणि विविध अवजारासाठी असलेले अनुदान शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध करून द्यावे, शिर्डी आणि राहता नगर परिषदेने पाणी वापराबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती करून पाण्याचा जपून आणि काटकसरीने योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.आढावा बैठकीनंतर जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत अनुकंपा तत्त्वावर देण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वितरण पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले .यामध्ये आदित्य अनाम, युवराज डोईफोडे, जीविका खांडेकर, प्रवीण पुणेकर, ललिता साळवे प्रथमेश कुसळेकर रिहान खान यांच्यासह इतर उमेदवारांना यांना लिपिक, कनिष्ठ अभियंता, शिक्षक सेवक, ग्रामपंचायत अधिकारी व अन्य पदावरील नियुक्ती पत्राचे वितरण केले.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!