अहिल्यानगर जिल्हा

प्रवरा फार्मसीत राष्ट्रीय फार्मसी सप्ताह आणि जागतिक औषधनिर्माता दिन उत्साहात

राज्यस्तरीय विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी-आरोग्यसेवेत औषधनिर्मात्यांची भूमिका अधोरेखित करण्यासोबतच विद्यार्थ्यांमधील ज्ञान, सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिंचोली मोहू प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी व बी. फार्मसी) येथे राष्ट्रीय फार्मसी सप्ताह व जागतिक औषधनिर्माता दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या आवाहनानुसार यंदा ‘एम्पॉवरिंग फार्मासिस्ट फॉर हेल्थियर फ्युचर’ अर्थात ‘निरोगी भविष्य घडविण्यासाठी औषधनिर्मात्यांचे सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यस्तरीय फार्मा प्रश्नमंजुषा, पोस्टर सादरीकरण, फार्मा रांगोळी आणि फार्मा रील स्पर्धांचा समावेश होता. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औषधनिर्मिती, औषधांचा योग्य वापर, आरोग्यविषयक जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानातील संधी यांविषयी आपले ज्ञान व कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली.

 

 प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य क्षेत्रातील औषधनिर्मात्यांचे महत्त्व स्पष्ट केले. रुग्णांना योग्य औषधांची माहिती देणे, औषधांचा सुरक्षित वापर सुनिश्चित करणे आणि समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणे, ही औषधनिर्मात्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना मिळण्याबरोबरच त्यांच्यातील कल्पकता, सादरीकरण कौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली.संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील यशस्वी वाटचाल सुरू आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!