अहिल्यानगर जिल्हा

पोलीस अंमलदार शंकर संपतराव चौधरी यांचे निलंबन मागे; अकोले पोलीस ठाण्यात पुनर्नियुक्ती

एसपी मुम्मका सुदर्शन यांचे आदेश; जिल्हा पोलीस दलातील चार अधिकारी-अंमलदारांना पुन्हा सेवेत रुजू होण्याची संधी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर संपतराव चौधरी यांच्यासह तीन पोलीस अधिकारी-अंमलदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. संबंधितांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन केल्यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, चौघांना निलंबनातून मुक्त करून पुन्हा सेवेत रुजू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निलंबनातून मुक्त करण्यात आलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर संपतराव चौधरी यांची अकोले पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. चौधरी यांना १३ जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या प्रकरणाचे पुनर्विलोकन केल्यानंतर निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि पोलीस अंमलदार बाळासाहेब राठोड यांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे. हर्षवर्धन बहीर यांची संगमनेर शहर पोलीस ठाण्यात, राजेंद्र वाघ यांची कर्जत पोलीस ठाण्यात, तर बाळासाहेब राठोड यांची शिर्डी शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांना २७ जुलै रोजी, राजेंद्र वाघ यांना २३ जून रोजी, तर बाळासाहेब राठोड यांना २१ जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते. या चारही अधिकारी-अंमलदारांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान, संबंधित अधिकारी-अंमलदारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या खातेनिहाय शिस्तभंगविषयक कारवाईच्या अधीन राहून त्यांना निलंबनातून मुक्त करण्यात आले आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!