अहिल्यानगर जिल्हा

महिला शेतकरी प्रमाणपत्रांमुळे महिलांच्या कष्टाला मिळणार अधिकृत ओळख व सन्मान!

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – तालुक्यात आतापर्यंत २०, हजार महिला शेतकऱ्यांची प्रमाणपत्रासाठी नोंदणी झाली आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रांमुळे महिलांच्या कष्टाला अधिकृत ओळख व सन्मान मिळणार असून महिलांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद ग्रामीण भागातील महिलांचा कृषी क्षेत्रातील सक्रिय सहभाग आणि अधिकृत ओळख मिळविण्यामधील महत्वपूर्ण भूमिका ठरणार आहे ,” असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.

 

महिला सक्षमीकरण विधेयकाच्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यात महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वाटप राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते राहता येथील कुंदन लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.महिला शेतकरी प्रमाणपत्रांमुळे ग्रामीण भागातील महिलांना शेती क्षेत्रात स्वतंत्र ओळख व सन्मान मिळणार असून, हा उपक्रम महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय ठरत आहे.

कार्यक्रमात बोलताना विखे पाटील म्हणाले की, “शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यांच्या कष्टांना, श्रमांना आणि कृषी क्षेत्रातील सहभागाला अधिकृत मान्यता मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख मिळवून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी प्रभारी, जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड , तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब भोरे, राहता यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि महिला शेतकरी उपस्थित होत्या.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!