धार्मिक

संपतराव चौधरी पाटील यांच्या ७७ व्या अमृत महोत्सवानिमित्त २१ नोव्हेंबरला जळगावात हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे हरिकीर्तन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व चौधरी पाटील परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय संपतराव नाथाजी चौधरी पाटील (तात्या) यांच्या ७७व्या अमृत महोत्सवानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे जाहिर हरिकीर्तन शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत अष्टविनायक मिल्क महादेव मंदिरासमोर आयोजित धार्मिक व सामाजिक सहवासाचा सोहळा पार पडणार आहे.

 

या हरिकीर्तनातून भाविकांना अध्यात्मिक उर्जा, सामाजिक मूल्यांची जाण आणि प्रेरणादायी विचारांचा लाभ मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.कार्यक्रमानंतर विविध मान्यवरांकडून संपतराव चौधरी पाटील यांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या जाणार आहेत.तसेच सर्व उपस्थितांसाठी सुरूची भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समस्त जळगाव ग्रामस्थ तसेच संपतराव चौधरी पाटील यांच्या सहवासातील आदरणीय मान्यवर विराजमान होणार आहेत.या विशेष सोहळ्याच्या प्रसंगी चौधरी पाटील परिवार, जळगाव ग्रामस्थ व अमृत महोत्सव निमंत्रक समिती यांनी सर्व जळगाव पंचक्रोशीतील मान्यवर,ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सस्नेह निमंत्रण दिले आहे.

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!