
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – राहाता तालुक्यातील जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा उत्साहात पार पडला.नूतन शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत वाघ, तर उपाध्यक्षपदी सौ.अश्लेषा चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे मावळते अध्यक्ष डॉ. गोरक्षनाथ चौधरी आणि उपाध्यक्ष शाम चौधरी यांनी सन 2023 ते 2025 या दोन वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा आढावा पालक व शिक्षकांसमोर सादर केला. शाळेच्या प्रगतीसाठी, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपयुक्त निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले व कार्यकाळात सहकार्य केलेल्या पालकांचे आणि शिक्षकांचे आभार मानले.
यानंतर नूतन शालेय व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी 31 हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली या निधीचा उपयोग शाळेच्या विविध विकासकामांसाठी केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.“जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे.विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक परिश्रम घेतात. शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनीही हातभार लावणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन बाबासाहेब चौधरी यांनी केले.
या निवडी प्रसंगी बाबासाहेब चौधरी, योगेश पंडित,विजय चौधरी, डॉ. गोरक्षनाथ चौधरी, शाम चौधरी,बाळासाहेब चौधरी,लहानु चौधरी,अशोक शिंदे , नूतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत वाघ उपाध्यक्ष सौ.अश्लेषा चौधरी शाळेचे शिक्षक नारायण जाधव, ठकाजी खेमनर, मंगल भडांगे, मारुती खरात तसेच माता-पालक संघ, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




