धार्मिक

सहकारी साखर कारखान्यातील गणेशोत्सवासाठी संचालक मंडळाकडुन ह.भ.प. रामगिरीजी महाराजांना निमंत्रण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

गणेशनगर – गणेश सहकारी साखर कारखाना,गणेशनगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.यानिमित्ताने (दि.२७) ऑगस्ट २०२५ रोजी कारखाना कार्यस्थळावर गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार असून या मंगल प्रसंगी श्री.क्षेत्र सरला बेटाचे ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज यांना निमंत्रण देण्यात आले.

 

यावेळी गणेश कारखान्याचे संचालक नानासाहेब नळे,विष्णुपंत शेळके, अनिलकाका गाढवे, संपतराव चौधरी, बाळासाहेब चोळके, अरविंद फोपसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन महंत रामगिरीजी महाराजांना गणेशोत्सवात उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले.भगवंताच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या एकतेच्या बळावर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, सभासद तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी,असे आवाहन गणेश कारखाना संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!