
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी – राहुल राजळे
नेवासा – तालुक्यातील घोगरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठीची सभा नुकतीच एस. व्ही. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेत चेअरमनपदी दाऊदभाई इज्जतभाई शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीची सूचना संचालिका सौ. सविता सुभाष पटारे यांनी मांडली, तर संचालक राधाकिसन साप्ते यांनी या सूचनेला अनुमोदन दिले.तसेच व्हा. चेअरमनपदी भानुदास बाळाजी दरगुडे यांची बिनविरोध निवड झाली. या पदासाठी संचालक रामदास शिरसाठ यांनी सूचना मांडली व दिगंबर पटारे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी अशोक साखर कारखान्याचे संचालक ज्ञानदेव पटारे, माजी चेअरमन सतीश पटारे, बशीर शेख, भास्कर घोगरे, बबन पऱ्हाड, दत्तात्रय बहिरट, अनिल पऱ्हाड, सुभाष पटारे, विलास पटारे, सुलतान शेख, नितीन लबडे, बाळासाहेब कडवळे, बाळासाहेब साप्ते, सचिव डी. बी. बहिरट आदी मान्यवर उपस्थित होते.नवीन चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांचे माजी मंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
