प्रशासकीयमहाराष्ट्र

जिल्हा वार्षिक योजनेतून जळगाव येथील तीन रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता: खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची माहिती

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहाता तालुक्यातील मौजे जळगाव गावातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी माहितीपत्रकाद्वारे नुकतीच दिली आहे.

 

खासदार वाकचौरे यांनी माहितीपत्रकात नमूद केले आहे की, जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मौजे जळगाव गावातील खालील तीन रस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये मौजे जळगाव ते लालवाडी रस्ता, तसेच जुना खैरी रोड (महेंद्र चौधरी) यांच्या घरापासून ते (संजय वाघ यांचे घर) रेल्वे चौकीपर्यंतचा रस्ता व पुणतांबा-जळगाव प्रजिमा 11 चितळी स्टेशन मार्ग (जळगावपासून) या रस्त्यांचा समावेश आहे.

 

या तीनही रस्त्यांच्या कामांमुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून, वाहतुकीची सोय अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल. गावातून जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील अडथळे दूर होऊन शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना तसेच सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.खासदार वाकचौरे यांच्यासह या विकासकामांसाठी सहकार्य केलेल्या सर्व संबंधित विभागांचे ग्रामस्थांनी आभार मानले असून, मंजूर झालेल्या सर्व कामांची दर्जेदार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

यावेळी जेष्ठ नेते गंगाधर चौधरी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका उपप्रमुख बाबासाहेब चौधरी, विजय चौधरी, डॉ. गोरख चौधरी, मच्छिंद्र भवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!