महाराष्ट्रशैक्षणिक

लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत सर्वज्ञ भोगे राज्यात सहावा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत स्व. सौ. एस. के. सोमैया प्राथमिक विद्यामंदिर येथील इयत्ता पहिलीतील होतकरू विद्यार्थी सर्वज्ञ ज्ञानेश्वर भोगे याने १५० पैकी १४० गुण मिळवत राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे. लहान वयात मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

 

या उल्लेखनीय यशाबद्दल अहिल्यानगर येथे आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यात शिक्षण संचालक श्री. टेमकर साहेब तसेच शिक्षणाधिकारी श्री. घुगे साहेब यांच्या हस्ते सर्वज्ञचा सन्मान करण्यात आला.सर्वज्ञच्या या यशामागे आदरणीय मीनाताई जगधने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वर्गशिक्षक श्री. ताके सर यांचे परिश्रम आणि मुख्याध्यापिका श्रीमती पैठणे मॅडम यांचे योग्य नेतृत्व यामुळे हे यश शक्य झाले आहे.या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्वज्ञचे अभिनंदन केले असून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!