
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा सिंधू छाया कॅम्पस चिंचोली (ता. सिन्नर ) येथील प्रवरा फार्मसी कॉलेज (महिला) येथील चतुर्थ वर्ष बी.फार्मसीच्या विद्यार्थिनी कु.पुनम घुगे, कु. प्रगती सोनटक्के, कु.साक्षी थेटे यांची मॅकलिओड्स फार्मासु्टिकल्स सारीगम (मध्य प्रदेश) येथे क्वालिटी अशुरंस कंट्रोल अधिकारी म्हणून चांगल्या वेतनावर निवड झाल्याची माहिती प्राचार्या डॉ. चारुशीला भंगाळे यांनी दिली.
प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून परिपूर्ण विद्यार्थी घडवत असतांना अभ्यासक्रमाबरोबरच संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे करिअर मार्गदर्शन, माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती, मुलाखत तंत्र, संवाद कौशल्य, विविध प्रशिक्षणे आणि प्रक्षेत्र भेटी, विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी वेगवेगळी व्याख्याने आयोजन केले जातात. संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी आणि स्वतंत्र प्लेसमेंट विभाग कार्यरत असल्यामुळे या विभागाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या कंपन्यांसोबत करारही होत असतात यामुळे नोकरी देण्यामध्ये प्रवरा ही अव्वल स्थानावर राहिली आहे असे प्लेसमेंट अधिकारी प्लेसमेंट प्रा. विकास कुंदे यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,प्राचार्या डॉ. चारुशीला भंगाळे यांनी अभिनंदन केले आहे.
महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्हाला अभ्यासक्रमाबरोबरच विविध विषयाची माहीती मिळाली. मुलाखत तंत्र, कौशल्य त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचे मिळालेलं मार्गदर्शन हे आम्हाला महत्त्वपूर्ण ठरले यासाठी संस्थेचे अध्यक्षआणि जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधांमुळे आम्हाला यश मिळाले असे निवड झालेल्या पुनम घुगे यांनी सांगितले.
