अहिल्यानगर जिल्हा

दिवाळीचा अनावश्यक खर्च टाळून रुद्र गाढवे याच्याकडून दुष्काळग्रस्तांसाठी ५ हजारांची मदत

बिपीनदादा कोल्हे यांच्या आवाहनाला बालमनाचा संवेदनशील प्रतिसाद!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

दरम्यान, कोल्हे यांनी आपल्या निवडीच्या निमित्ताने सत्कार समारंभांना फाटा देऊन त्याऐवजी दुष्काळग्रस्त बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशनगर येथील श्री. राहुल तुकाराम गाढवे यांचे चिरंजीव रुद्र याने यंदाच्या दिवाळीत फटाके, नवीन कपडे आणि इतर अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल ५ हजार रुपयांचा निधी आमदार श्री. विवेक कोल्हे यांच्याकडे सुपूर्द केला.

लहान वयातच सामाजिक जाणिवेचे भान ठेवत रुद्रने दाखविलेली ही संवेदनशीलता आणि दातृत्व निश्चितच कौतुकास्पद असून, त्याचा आदर्श इतर मुलांसह समाजानेही घ्यावा, अशी भावना यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंच्या जीवनातही प्रकाश निर्माण करण्याचा रुद्रचा हा छोटासा पण मोलाचा प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

      याप्रसंगी गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. सुधीर लहारे, व्हाईस चेअरमन श्री. विजय दंडवते, माजी चेअरमन ऍड. नारायणराव कार्ले, माजी व्हा. चेअरमन शिवाजीराव लहारे, संचालक बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, भगवानराव टिळेकर, संपतराव हिंगे, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, बाळासाहेब चोळके, अनिल गाढवे, मधुकर सातव, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, अरविंद फोपसे, बलराज धनवटे, ज्ञानदेव चोळके, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे, जनरल मॅनेजर नितीन भोसले, माजी संचालक संजय शेळके, राहुल गाढवे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी व सभासद बंधू उपस्थित होते.

रुद्रच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, बिपीनदादा कोल्हे यांच्या सामाजिक आवाहनाला मिळालेला हा बालमनाचा प्रतिसाद खऱ्या अर्थाने माणुसकीची दिवाळी उजळवणारा ठरला आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!