अहिल्यानगर जिल्हा

आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धेत पायरेन्सच्या दोन विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!

अदित्य चतुर आणि कु. सृष्टी चौधरीला प्रथम क्रमांक; दोघांचीही विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

लोणी-पायरेन्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन (आयबीएमए) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा २०२६’मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. एमबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी अदित्य चतुर आणि कु. सृष्टी चौधरी यांनी विभागीय स्तरावर चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून, दोघांचीही विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती आयबीएमएचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी दिली.

अदित्य चतुर याने ‘इंटेलिजंट लेजर बॉर्डर सिक्युरिटी अँड थ्रेट डिटेक्शन सिस्टम’ हा अभिनव संशोधन प्रकल्प सादर केला. सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संभाव्य धोके ओळखण्याची अभिनव संकल्पना या प्रकल्पात मांडण्यात आली आहे. त्याच्या संशोधन प्रकल्पाने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला.

कु. सृष्टी चौधरी हिने ‘ॲक्वागार्ड आयओटी-आधारित स्मार्ट वॉटर लिकेज डिटेक्शन अँड प्रिव्हेंशन सिस्टम’ हा नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सादर केला. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या माध्यमातून पाण्याची गळती अचूकपणे शोधणे आणि ती रोखण्यासाठी स्मार्ट यंत्रणा विकसित करण्याची संकल्पना या प्रकल्पात मांडण्यात आली आहे. तिच्या प्रकल्पालाही विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला.

दोन्ही विद्यार्थ्यांनी संशोधन, नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समाजोपयोगी वापर यांचा प्रभावी संगम साधत केलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील तसेच पायरेन्सचे सचिव तथा संचालक डॉ. निलेश बनकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!