स्नेहालय संस्था अहिल्यानगर

नेवासा येथे श्रमसंस्कार शिबिरात स्नेहालय उडान प्रकल्पाचा बालविवाह विरोधी कार्यक्रम

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 

नेवासा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व मुळा एज्युकेशन सोसायटीचे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय, नेवासा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन बुधवार, १ जानेवारी ते मंगळवार, ७ जानेवारी २०२५ या कालावधीत मौजे हंडीनिंबगाव (ता. नेवासा) येथे करण्यात आले. शिबिरात ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या वतीने “बालविवाह रोखण्यासाठीचा सामाजिक बदलाचा पाया” या विषयावर विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

 

कार्यक्रमात उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रविण कदम यांनी उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे हक्क व संरक्षण, मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, शासकीय योजना व बाल संरक्षण समितीची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक आणि सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने तरुण पिढीला बालविवाह रोखण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमादरम्यान उपस्थित तरुणांनी बालविवाह, बालकांचे हक्क आणि संरक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली. यावेळी स्नेहालय संस्थेच्या कार्यपद्धती व विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली.डॉ.संजय मेहर (राष्ट्रीय सेवा योजना विभाग समन्वयक) यांनी स्नेहालयच्या कार्याचे कौतुक करत तरुणांनी संस्थेला भेट देऊन समाजसेवेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना प्रा. गणेश गारुळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. नवनाथ आगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा दहातोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी सजगता आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण झाली.

जाहिरात

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!