कोपरगाव तालुका

राज्य पत्रकार संघटनेच्या कोपरगाव पदाधिकाऱ्याचे कार्य कौतुकास्पद- महंत रमेशगिरीजी महाराज

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना कोपरगाव शाखेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

प्रतिनिधी-अक्षय काळे

 

कोपरगाव तालुक्यातील राज्य पत्रकार संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधीस्थान बेट कोपरगावचे मठाधिपती महंत परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांनी काढले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना कोपरगाव शाखेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सन २०२५ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

 

या प्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, शहराध्यक्ष हफिज शेख, उपशहराध्यक्ष स्वप्नील कोपरे,शहर कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड, जेष्ठ सदस्य फकीरराव टेके, किसन पवार, संतोष जाधव, विनोद जवरे, मधुकर वक्ते, सोमनाथ डफळ, अमोल गायकवाड, दिनेश जोशी,काकासाहेब खर्डे,अक्षय काळे,राहुल कोळगे,गणेश बत्तासे,संदीप विदुर, राजेंद्र तासकर,सुमित थोरात,विजय कापसे आदी पत्रकार उपस्थित होते.

 

या प्रसंगी परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांनी पुढे बोलताना सांगितले की, जगाच्या जडणघडणी मध्ये पत्रकाराच्या बहुमुल्य वाटा असून पत्रकार जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट गोष्टी जगासमोर मांडत असतो या सर्वांमध्ये कोपरगावच्या सर्वच पत्रकाराचे एक अमूल्य योगदान आहेच आणि आज त्यांनी नव्याने तयार केलेल्या २०२५ च्या माहिती दिनदर्शिकेतुन दाखवून दिले असल्याचे सांगत सर्व पत्रकारांना शुभाशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या.

 

या प्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप यांनी संघटनेच्या कामाचे प्रास्ताविक करत प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनदर्शिका प्रकाशित करणे हे पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि विविध घटकांच्या जनजागृतीसाठी एक प्रभावी पाऊल असून अशा प्रकारच्या दिनदर्शिकेमुळे संघाची ओळख अधिक दृढ होऊन पत्रकार बांधवांना एकत्रित ठेवण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संघटनेचे शहर कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड यांनी केले.

जाहिरात

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!