(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
नेवासा – तालुक्यातील मौजे आदर्शगाव सुरेशनगर सरपंच शैला कल्याण उभेदळ व ग्रामसेवक कैलास इंगळे यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग अहिल्यानगर यांच्याकडून पंचायत समिती नेवासा यांना देण्यात आले आहे.
मौजे सुरेशनगर ता.नेवासा येथील चालू असलेले आरोप प्रत्यारोप नंतर अखेर गावातील भ्रष्टाचार हा शासनाने त्यांच्या अहवालातून उघड केला आहे. या बेकायदेशीर झालेल्या कामाची पाहणी प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित दखल घेऊन यांच्या आदेशानुसार नेमलेले विस्ताराधिकारी साहेब शेवगाव व बिडीओ साहेब अहिल्यानगर यांनी गावात येऊन सविस्तर काम पाहणी व सर्व ग्रामपंचायत दप्तर रेकॉर्ड पाहणी करून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे.व त्या अहवालात त्यांनी भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचे नमूद केलेलं असून सरपंच शैला कल्याण उभेदळ व ग्रामसेवक कैलास इंगळे यांच्यावर भ्रष्टाचार रक्कम वसुल करण्याचे आदेश अहवालामध्ये दिलेले आहे.
या दिलेल्या अहवालानंतर सर्व गावकरी बांधव, माता-भगिनी, तरुण बांधव यांनी शासन अधिकारी यांचें आभार मानले. तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड पणे काम करणारे अमृत उभेदळ, बाबासाहेब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विकास उभेदळ यांच्या मागणीवरून बेकायदेशीर काढलेली रक्कम वसुली करण्यात आलेल्या अहवाल आदेश सोबतच *शासन जीआर महाराष्ट्र परिपत्रक क्रमांक व्हीपीएम/प्र.क्र. २५३/पंरा-९दि.१२जून२०१३ (ग्रामविकास विभाग)* अन्वये ग्रामपंचायत मध्ये गैरव्यवहार भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवक या दोन्ही दोषींवर वरील परिपत्रक जीआर अनुसरून सरपंच व ग्रामसेवक या दोषींवर २४ जानेवारी पर्यंत उचित कार्यवाही न झाल्यास अमृत सुरेशराव उभेदळ हे मौजे प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जलसमाधी घेणार असल्याचे त्यांनी लेखी निवेदन दिले आहे.त्या जलासमधी प्रसंगी माझ्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास सरपंच,ग्रामसेवक,पंचायत समिती नेवासा, मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग अहिल्यानगर,शासन,प्रशासन हे जबाबदार असतील असे त्यांनी त्यांच्या निवेदनात दिलें आहे.
“सदर बाबी मध्ये सरपंच शैला कल्याण उभेदळ व तत्कालीन ग्रामसेवक श्री.इंगळे.के.बी यांनी अनियमितता केल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत सुरेशनगर मध्ये बेकायदेशीर काढलेली रक्कम सरपंच शैला कल्याण उभेदळ व तत्कालीन ग्रामसेवक श्री.इंगळे.के.बी यांचेकडून समप्रमाणात वसूल करण्याचे दिले आदेश.
– जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब अहिल्यानगर.
सरपंच व ग्रामसेवक या दोषींवर २४ जानेवारी पर्यंत उचित कार्यवाही न झाल्यास मौजे प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी घेणार जलसमाधी..
– अमृत उभेदळ-तक्रारदार
चोराच्या उलट्या बोंबा..!
सुरेशनगर येथील सरपंच व ग्रामसेवक हे दोषी असूनही काही प्रसार माध्यमांमध्ये आपली चांगली छबी उमटवण्याचा एक केविलवाना प्रयत्न करत आहेत.
– विकास उभेदळ-ग्रा.पं.सदस्य सुरेशनगर