नेवासा तालुका

यश अकॅडमीच्या जान्हवी खंडागळेची राष्ट्रीय स्तरावरील डॉ. होमी भाभा विज्ञान परीक्षेसाठी निवड

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

 प्रतिनिधी राहुल राजळे

 

सोनई -यश अकॅडमीच्या विद्यार्थिनी जान्हवी खंडागळे हिची पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील डॉ. होमी भाभा विज्ञान परीक्षेसाठी निवड झाली आहे.

डॉ. होमी भाभा विज्ञान परीक्षा ही विज्ञान विषयात रुची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रतिष्ठित परीक्षा आहे. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण अशा या स्पर्धेत जान्हवीने आपले कौशल्य दाखवत राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले आहे.मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा . उदयन गडाख , सचिव उत्तमरावजी लोंढे सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी कौतुक केले. 

 

 

           “जान्हवीला प्राचार्य अझर गोलंदाज , पर्यवेक्षक असिफ बाबुलाल व विज्ञान शिक्षक भाऊसाहेब दराडे व इतर शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले .जान्हवीच्या या यशासाठी सर्वस्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!