कोपरगाव तालुका

रांजणगाव देशमुख विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजेश दिघे, व्हाईस चेअरमनपदी आशाताई गुडघे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या रांजणगाव देशमुख येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजेश दिघे तर व्हाईस चेअरमनपदी सौ. आशाताई गुडघे यांची निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे,आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी रांजणगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तसेच ग्रामस्थांच्या वतीने नवनियुक्त चेअरमन राजेश दिघे व व्हाईस चेअरमन सौ. आशाताई गुडघे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत सोसायटीच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला.

 

यावेळी प्रकाश गोर्डे, बाळासाहेब गुडघे, अनिल भालकर, सुरेश देशमुख, संपत खालकर, वीरेंद्र वर्पे, बाळासाहेब रणछोड, संतोष वर्पे, हरिभाऊ रहाणे, सुनील रणछोड, सुरेश चव्हाण, अशोक विघे, रामनाथ रहाणे, अजित गुडघे, धनंजय वर्पे, राहुल वर्पे, भाऊसाहेब गुडघे, प्रमोद गुडघे, चंद्रभान खालकर, सोमनाथ वर्पे, भगवान गेबरे, राजेंद्र गेबरे, संतोष बिडवे, बाळासाहेब बिडवे, रवींद्र खालकर, बाळासाहेब खालकर, सचिन गोर्डे, भाऊसाहेब गोर्डे, भाऊसाहेब रणछोड, संतोष रणछोड, विलास वामन,श्रावण खालकर,आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!