
अहिल्यानगर:- मुला मुलींनी आपल्याबद्दल कोणतीही चुकीची घटना घडत असेल तर या वाईट स्पर्शाच्या संदर्भात मुलींनी सतर्कता बाळगावी असे काही घडल्यास त्याची सर्व माहिती आपल्या पालकांना, शिक्षकांना आवश्यक द्यावी आपल्या मनात कोणतीही भीती बाळगू नये.विद्यार्थी-विद्यार्थीनी सतर्क रहावे. त्यामुळे एखादी चुकिची घटना होण्यास व बालकांचे लैंगीक अत्याचारास आळा बसेल. लैंगिक अत्याचारा संबंधित कायदे कडक झालेले आहेत मुलीच्या संदर्भात तक्रार आल्यास त्याची दखल आम्ही घेणारच.मुलींनी चुकीची घटना घडल्यास त्याची माहिती द्यावी विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श वाईट स्पर्श यासंदर्भात आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा.न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी सर्वच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.न्यायाधीश व्ही. व्ही.जोशी होते. यावेळी जामखेड तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड .ए. के. शेख यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण कायदा ,स्त्रीभ्रुण हत्या व इतर सामाजिक दुष्कृते याविषयी जनजागृती करून उपस्थित विद्यार्थ्याना सखोल मार्गदर्शन केले.
जामखेड तालुका विधी सेवा समिती ,रयत शिक्षण संस्थेचे श्री. नागेश महाविद्यालय व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुकुल प्रकल्प अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराच्या सह इयत्ता पाचवी ते नववी विद्यार्थ्यांसाठी न्यायालय परिसर व कामकाज क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी श्री नागेश महाविद्यायाचे प्राचार्य मडके बी.के यांच्या हस्ते ज्यूनियर कॉलेज व एनसीसी कॅडेट यांच्या सहकार्याने जामखेड शहरांमध्ये स्वच्छता जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संतोष ससाणे यांनी गुरुकुल अंतर्गत पाचवी ते नववी क्षेत्रभेट उपक्रमांमध्ये न्यायालयाचे सर्वसाधारण कामकाज कसे चालते याची माहिती देवून यावेळी न्यायालयीन स्टाफ व वकील यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजा विषयी सखोल मार्गदर्शन केले. रयत गुरुकुल बद्दल सर्वांना माहिती दिली मार्गदर्शन केले.जामखेड वकील संघटने नूतन अध्यक्ष ॲड.प्रमोद राऊत, उपाध्यक्ष यावेळी जामखेड वकील संघटने नूतन अध्यक्ष ॲड.अमीर पठाण, सचिव ॲड.अक्षय वाळुजंकर यांची निवड झाल्या बद्दल सन्मान करण्यात आला ॲड.महारुद्र नागरगोजे व मयुर भोसले सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संभाजी इंगळे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर जामखेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद राऊत, उपाध्यक्ष ॲड.अमीर पठाण, माजी अध्यक्ष ॲड.ए,के शेख ,सचिव अक्षय वाळुंजकर , प्राचार्य मडके बी के, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, प्रा. विनोद सासवडकर, एनसीसी अधिकारी मयुर भोसले, ॲडसंग्राम पोले, ॲड.शिवाजी लटपटे, ॲड.के. जी. शिरोळे, ॲड के. डी. गायकवाड, ॲड.पी. जे. थोरात,ॲड.ढाळे, ॲड बाळासाहेब घोडेस्वार,शेळके पी व्ही, सी एस ढेपे, एस. ए. ढगे, जी. व्ही. माखले, ए. एस. अमीना, ए.एल. चव्हाण, आर. एम. परजने, संभाजी इंगळे, अशोक सांगळे,सागर फुंडे, एस. आर. रणदिवे, शंकर गुट्टे, ज्योती पालकर, मनीषा शिनगारे, रणजित मोरे, ज्ञानेश्वर शेटे नरसाळे मॅडम,देशमुख मॅडम, डुबल मॅडम सर्व शिक्षक वकील याचबरोबर न्यायालयीन अधिकारी वर्ग उपस्थित होते.
