
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या ६७ विद्यार्थिनींची राज्यस्तरी संस्कृत प्रतिभा शोध -परीक्षा २०२४-२५ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक,नागपूर ,विस्तार सेवा मंडळ रवी कीर्ति संस्कृत अध्ययन केंद्र, सांगली यांनी घेतलेल्या संस्कृत प्रतिभा शोध परीक्षेत शाळेच्या इयत्ता आठवी, नववी आणि दहावी, च्या एकूण ४६५ विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला होता त्यातील एकूण ६७ विद्यार्थिनींचा जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत भरघोस यश प्राप्त करून राज्यस्तरावर निवड झाली आहे. अशी माहीती प्राचार्या सौ.भारती कुमकर यांनी दिली.
प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न केले जातात. इंग्रजी सोबतच मराठी ही ज्ञान देत असताना विद्यार्थिनींना संस्कृत विषयाचे देखील ज्ञान कन्या विद्या मंदिर च्या माध्यमातून दिले जाते. संस्कृत विषयात देखील प्रवरेच्या कन्या हे अव्वल स्थानावर राहिल्या आहेत. त्यांना संस्कृत शिक्षिका निशाली शेजुळ यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.
