
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – तालुक्यातील श्री.क्षेत्र गोंडेगाव येथील नवसाला पावणारी व गावचे ग्रामदैवत येडुआई (जगदंबा माता) यात्रा उत्सव बुधवार (दि.२) ते गुरुवार (दि.३) एप्रिल रोजी लक्ष्मी पंचमीला सुरू होत आहे.त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी जगदंबा युवा ग्रुपच्या वतीने बुधवारी (दि.२) रोजी सकाळी ६ वाजता देवीच्या काठीची मिरवणूक होणार असून श्री.क्षेत्र ऐकविरा कार्ला येथून सुमारे २९० किलो मिटर वरून ज्योत आणणार असून गोंडेगाव पंचक्रोशी मध्ये त्या ज्योतीची भव्य मिरवणूक होणार आहे.यावर्षी जगदंबा युवा मशाल ग्रुपचे ज्योत आणण्याचे पंधरावे वर्षे आहे.
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटाचे मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरी महाराजांचे प्रवचन सायंकाळी ५ वा .तर र देवीचा छबीना रात्री ८ वा निघणार आहेत .यावेळी फटाक्यांच्या आतषबाजी व जगदंबा आखाडी मंडळाच्या दशावतारी सोंगाचा कार्यक्रम , देवीच्या मंदिरासमोर गावचे प्रसिद्ध वाघे मधुकर आमले यांचे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे (दि.३) एप्रिल वार गुरुवार रोजी सकाळी कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार असून दुपारी चार वाजता कुस्त्यांचा हंगामा होणार आहे. रात्री ७ वा स्वाती पुणेकर लावण्या अप्सरा आक्रोष्ट्रा आयोजित करण्यात आले आहे. यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेडूआई देवीच्या मंदीराला व परिसरात आकर्षीत विद्युत रोषणाई करण्यात आली. तरी या उत्सवाचा पंचकोशितील भाविक भक्त लाभ घ्यावा असे आवाहन वेडूआई यात्रा कमिटी व गोंडेगाव ग्रामस्थांनी केले आहे.
