गुन्हेगारीधार्मिक स्थळाची विटंबनापुणतांबा

पुणतांबा (ता.राहाता) परिसरातील गोदावरी नदीकाठच्या धार्मिक मंदिरात अज्ञात व्यक्तीकडून विटंबना!

पुणतांबा परिसरात धार्मिक स्थळांची विटंबना करण्याचे सत्र सुरूच !

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

अहिल्यानगर:(ता.२३)-पुणतांबा (ता.राहाता) परिसरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास गोदावरी नदीकाठी असलेल्या यज्ञसेणी मंदिराच्या लगतच्या श्री. घृष्णेश्वर  महादेव मंदिरांमधील पिंडीची व नंदीच्या मूर्तीची अज्ञात इसमा कडून तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याची घटना रविवारी (२२) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .पुणतांबा परिसरात घटनेमुळे तीव्र पडसाद उमटलेले आहे पुणतांबा गावात धार्मिक स्थळाची विटंबना करण्याची ही लागोपाठ दुसरी घटना घडलेली आहे.

 

काल मध्यरात्री घडलेल्या घटनेची माहिती पुणतांबा गावचे प्रथम लोकनियुक्त मा.सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांना समजली त्यांनी तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने,यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन मोठ्या फौज फाट्यासह पुणतांब्यात दाखल झाले असून श्री.घृणेश्वर महादेव मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाने पाहणी करून घटनेचे गांभीर्य ओळखले असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार अहिल्यानगर येथील श्वान पथकाला पाचरण करण्यात आले आहे पोलीस यंत्रणेकडून पुढील चौकशीचे सूत्र फिरविण्यात येत आहे.

 

पुणतांबा परिसरात धार्मिक स्थळांच्या विटंबना करण्याचे सत्र थांबत नसून मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी पुणतांबा रेल्वे स्थानकात शेजारील असलेल्या श्री.हनुमान मंदिराची देखील अशाच पद्धतीने एका माथेफिरू व्यक्तीने विटंबना केली होती या दरम्यान एका अज्ञात माथेफिरूने श्री.हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केली होती घटनेच्या दुसऱ्या दिवशी संबंधित माथेफिरू व्यक्तीला अटक करण्यात आली प्रकरण कुठेतरी शांत झालेले असतानाच अशाच एका घटनेची पुनरावृत्ती पुन्हा घडलेली असून श्री.घृष्णेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीसह नंदीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची समजल्याने समस्त हिंदू धर्मियांच्या भावना अतिशय मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेलेल्या आहे परंतु या घडलेल्या दोन्हीही घटनांच्या मागे कोणत्या अज्ञात व्यक्तीचा हात असेल ही बाब अद्यापही समोर आलेली नाही.

 

या घटनेने पुणतांबा पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात धार्मिक वातावरण ढवळून निघालेले आहे परिसरामध्ये सध्याला तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२३) रोजी आशा केंद्र चौक या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली यात हजारो ग्रामस्थ सहभागी झाले पुढील तीन दिवसात घटनेचा छडा न लागल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणतांबे गावातील आठवडे बाजार व गावातील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवलेल्या आहे पुणतांबा गावामध्ये निषेध सभेचे आयोजन करण्यात आलेले असून श्री.घृणेश्वर महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीसह नंदी देवाच्या मूर्तीची विटंबना करणारा अज्ञात कोण असेल ..? घटनेबाबत पोलीस प्रशासनाने चौकशी सुरू केली असून लवकरात लवकर घटनेतील अज्ञात आरोपीला अटक करण्याचे आश्वासन पुणतांबा ग्रामस्थांना देण्यात आलेले आहे पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर अशा केंद्र चौक पुणतांबा येथील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे घडलेली घटना निंदनीय असून या घटनेची सखोल चौकशी करून ‘त्या अज्ञात आरोपीला’ अटक करण्याची मागणी पुणतांबा ग्रामस्थांनी केलेली आहे.

 

 

 

 

“घृष्णेश्वर मंदिर पुणतांबा ,यज्ञसेनी देवी मंदिर जवळ अज्ञात व्यक्तींनी मंदिराचे मूर्तींचे विटंबना केली आहे. पोलीस उपअधीक्षक  शिरीष वमने यांच्याशी चर्चा नंतर अहिल्यानगर येथील श्वान पथक व तेथे पडलेल्या दगडांवरचे ठसे घेण्यासाठी टीम येत आहे. तसेच रात्रीचे सर्व कॅमेरे व दूरध्वनीचा तपास करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. सर्व युवकांनी संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच सोमवार बाजार हा देखील बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. पोलिसांनी हा तपास तातडीने करावा ,अशी मागणी डॉ.धनंजय धनवटे यांनी केली आहे. सर्व युवकांनी गावात अश्या घटना घडू नये यासाठी सतर्क राहावे अशी विनंती केली आहे.”

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!