
(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)
चितळी: (ता.२३) -रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे १९९३-९४ बॅचचे माजी विद्यार्थी श्रीराम बबन गुंजाळ यांनी चितळी महाविद्यालयास नुकतेच कॅनॉन कंपनीचे प्रिंटर भेट दिले आहे.
श्रीराम गुंजाळ यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत चितळी महाविद्यायात शिक्षण घेतले असून १९९३-९४ बॅचचे माजी विद्यार्थी आहेत ते सध्याला नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेले आहेत उच्चपदावर रुजू आहेत यापूर्वी त्यांनी अनेकदा चितळी महाविद्यालयासाठी गरजेचे साहित्य भेट दिलेले आहे चितळी महाविद्यालयाविषयी असलेली कृतज्ञता भावना महाविद्यालयास प्रिंटर भेट देवून व्यक्त केली आहे.
यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी काशिनाथ दुधाने,चेतन झावरे राजू पवार,संदीप राहींज,महेंद्र भोसले आदींनी श्रीराम गुंजाळ यांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात प्रिंटर भेट दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन धोत्रे पर्यवेक्षक सुधाकर पिलगर उपशिक्षक संजय राहणे,अमोल आरगडे,संगणक शिक्षक कैलास वाघ यांच्याकडे सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रिंटर सुपूर्द केले यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर पिलगर यांनी माजी विद्यार्थी श्रीराम गुंजाळ यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानले आहेत.
