अहिल्यानगर जिल्हाचितळी महाविद्यालय

स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी; विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संस्कार अंगीकारावा-श्रीमती निर्मळ

न्यू इंग्लिश स्कूल चितळीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात;विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

चितळी – स्वच्छता ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येकाने ती आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चितळी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती निर्मळ ए. एस. यांनी केले.महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. सातव ए. एस. यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका सातव ए. एस. होत्या.प्रमुख वक्त्या श्रीमती निर्मळ यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावत जगाला अहिंसा, समता आणि स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. घर, शाळा, कार्यालय तसेच परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला ‘जय जवान, जय किसान’ हा नारा जवान व शेतकऱ्यांप्रती असलेला आदर आणि आपुलकी दर्शविणारा आहे. विद्यार्थ्यांनी या दोन्ही महान विभूतींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन स्वच्छतेचे महत्त्व समजून घ्यावे आणि ते आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. उत्तम स्वच्छता केल्याबद्दल श्री. झुराळे ई. एल. यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले. स्वच्छता मोहिमेस परवानगी दिल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. शिरसाठ एन. एन. यांचेही आभार मानण्यात आले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!