गुन्हेगारी

जामखेडमध्ये दोन हॉटेल्सवर विशेष पोलिस पथकाचा छापा; कारवाईत १.२० लाखांचा अवैध दारू साठा जप्त, ३ आरोपी अटकेत

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

जामखेड – अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात दोन हॉटेल्सवर छापा टाकून विशेष पोलिस पथकाने एकूण १,२०,४६५ रुपयांचा देशी-विदेशी अवैध दारूचा साठा जप्त करत तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या मोहिमेचा भाग म्हणून करण्यात आली.

 

१८ जून रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने जामखेड परिसरात गस्त घालण्यात येत असताना गोपनीय माहितीच्या आधारे हॉटेल पाटील वाडा आणि हॉटेल साई लॉजिंग येथे कारवाई करण्यात आली. पहिल्या ठिकाणी, हॉटेल पाटील वाडा येथे छापा टाकल्यानंतर किसन सुरेश जरे (रा. मतकुळी, ता. अष्टी, जि. बीड) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून २६,९१० रुपये किंमतीची दारू आणि १५,२७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

 

त्यानंतर हॉटेल साई लॉजिंग येथे झालेल्या कारवाईत सचिन विक्रम तनपुरे आणि सतिष नवनाथ पवार (दोघेही रा. शिरूर, ता. जामखेड) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून एकूण ७८,२८५ रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये विविध प्रकारची बिअर, व्हिस्की, रम, व्होडका आदी दारू समाविष्ट होती.

 

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन येथे अनुक्रमे गुन्हा क्रमांक ३३२/२०२५ व ३३३/२०२५ नुसार मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे की, जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अशीच कठोर कारवाई सुरु राहील आणि माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे व श्री. वैभव कलुबमे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ. शंकर चौधरी, दिनेश मोरे, भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, अजय साठे, अमोल कांबळे, अक्षय भोसले आणि सुनिल दिघे या कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.

 

 

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!