अहिल्यानगर जिल्हा

चिंचोली येथील प्रवरा फार्मसीत ‘अविष्कार २०२६’ संशोधन स्पर्धा संपन्न

महाविद्यालयातील १२ संशोधन प्रकल्पांची विभागीय स्तरासाठी निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी-विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती जोपासण्यासह नावीन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी. व बी. फार्म), चिंचोली मोहू, सिन्नर येथे ‘अविष्कार २०२६’ ही संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाविद्यालयातील सुमारे १२ संशोधन प्रकल्पांची विभागीय स्तरासाठी निवड करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (रायगड) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमधील संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित करणे, नवसंकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणे हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे. प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी विद्यार्थ्यांना ‘अविष्कार’ स्पर्धेचे महत्त्व विशद करून संशोधन क्षेत्रातील संधींची माहिती दिली.स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. चारुशीला भंगाळे आणि प्राचार्य डॉ. सतीश बोरनारे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. प्रियंका गायकवाड आणि प्रा. अर्चना कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. 

यशस्वी संशोधकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील,संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ आदींनी अभिनंदन केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!