अहिल्यानगर जिल्हाकोपरगाव तालुका

आ. विवेक कोल्हे यांच्या विशेष पाठपुराव्याला यश; शहा येथील ७ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – शहा येथे २१.५० एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेला ७ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. शेतकऱ्यांच्या वीजविषयक अडचणी दूर होऊन शेतीपंपांना दिवसा अधिक सक्षम वीजपुरवठा मिळावा, यासाठी आ. विवेक कोल्हे यांनी विशेष पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, या प्रकल्पामुळे चास उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सहा गावांतील शेतीपंप ग्राहकांना लाभ होणार आहे.

 

शहा येथील या सौर ऊर्जा प्रकल्पातून ११ केव्ही वीजवाहिनीद्वारे ३३/११ केव्ही चास उपकेंद्राला सौर वीज उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातून चासनळी उपकेंद्रांतर्गत मंजूर एजी, वडगाव एजी, बक्तरपूर एजी आणि मोरविस एजी या चार कृषी फीडरना वीजपुरवठा होणार आहे. याचा लाभ चासनळी, मोर्विस, वडगाव, बक्तरपूर, मंजूर आणि हांडेवाडी या गावांतील शेतीपंप ग्राहकांना मिळणार आहे.

 

शेतीपंप ग्राहकांना दिवसा अधिक सक्षम वीजपुरवठा मिळावा आणि वीजभाराचे व्यवस्थापन सुधारावे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आ. विवेक कोल्हे यांनी संबंधित यंत्रणेकडे विशेष पत्रव्यवहार करून या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून, संबंधित गावांतील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

 

चास उपकेंद्रांतर्गत एकूण ३ हजार २८८ वीज ग्राहक आहेत. त्यामध्ये १ हजार ६०३ शेतीपंप ग्राहक, १ हजार ४९७ घरगुती ग्राहक, १३४ व्यापारी ग्राहक, २४ औद्योगिक ग्राहक आणि ३० इतर वीज ग्राहकांचा समावेश आहे. या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात शेतीपंप ग्राहकांची संख्या मोठी असल्याने शहा येथील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कृषी वीजपुरवठ्याच्या नियोजनाला बळ मिळणार आहे.

शहा येथील ७ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असल्याने चास उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या चार कृषी फीडरवरील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.आ. विवेक कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या वीजविषयक अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या विशेष पत्रव्यवहार आणि पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प कार्यान्वित होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. त्यामुळे सहा गावांतील शेतीपंप ग्राहकांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांनी या निर्णयाबाबत आ. विवेक कोल्हे यांचे आभार व्यक्त केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!