अहिल्यानगर जिल्हा

प्रवरा कृषी शास्त्रच्या खेळाडूंना कुस्ती व शरीरसौष्ठव स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदके 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

लोणी-मिरजगाव येथील सदगुरू कृषि महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन कुस्ती व शरीर सौष्ठव स्पर्धेत लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या दोन खेळाडूंना अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केलेले आहे.

 

या खेळाडूंमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत शिवम लेकुरवाळे याने सुवर्ण पदक तर गणेश धडांबे याने ६२ किलो वजनी गटाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक मिळविले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत १० जिल्हातील ३५ महाविद्यालयातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 

 

 या दोन्ही खेळाडूंचा संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल खडके , कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा स्वरांजली गाढे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ काजल खंडागळे व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ शुभांगी निळे आदी उपस्थित होत्या. या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. सिताराम वरखड यांचे मार्गदर्शन लाभले.

 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकरी अधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे , प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ.उत्तमराव कदम आदींनी अभिनंदन केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!