(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगांव – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजता कारखाना कार्यस्थळावर होत आहे.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली, कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेकभैय्या कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर संचालक बाळासाहेब वक्ते, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सरलाताई बाळासाहेब वक्ते या उभयतांच्या हस्ते गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यांत येणार आहे तरी जास्तीत जास्त उस उत्पादक सभासद शेतक-यांनी या कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे आदिंनी केले आहे.