अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

श्री साईबाबा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

महाविद्यालयीन गटात मॉडर्न लॉ कॉलेज, पुणेचे यश;खुल्या गटात अरविंद महेश्वरी प्रथम

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

प्रतिनिधी-शंकर सोनवणे 

 

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री साईबाबांच्या जीवनकार्याचा, विचारांचा आणि मानवतावादी संदेशाचा प्रसार युवकांमध्ये व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शिर्डी येथील श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील सांस्कृतिक भवन येथे २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत महाविद्यालयीन गटात १८ संघांनी, तर खुल्या गटात २८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साई प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व आरतीने झाले. स्पर्धेसाठी ‘श्रद्धा आणि सबुरी’, ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात साईबाबांच्या विचारांची गरज’ आणि ‘सबका मालिक एक – राष्ट्रीय एकात्मतेचा मूलमंत्र’ हे विषय देण्यात आले होते.

स्पर्धेचे निकाल

महाविद्यालयीन गट:

 प्रथम: प्रियांका विजय सिनारे व कीर्ती कुमारी (मॉडर्न लॉ कॉलेज, पुणे) – रोख ₹११,०००

 द्वितीय: जोया फारुक कतवाल व सागर अरविंद महेश्वरी (श्री साईबाबा महाविद्यालय) – रोख ₹७,०००

 तृतीय: अंकिता रोहिदास जवादे व रामेश्वर ज्ञानेश्वर निंबाळकर (के. जे. सोमय्या महाविद्यालय, कोपरगाव) – रोख ₹५,०००

 उत्तेजनार्थ प्रथम: वैष्णवी साहेबराव आभाळे व ऋतुजा बाळासाहेब दिघे (लोकनेते बाळासाहेब थोरात महाविद्यालय, तळेगाव दिघे) – रोख ₹२,१००

 उत्तेजनार्थ द्वितीय: ज्ञानेश्वर माधव सावंत व ओम कैलास जाधव (डॉ. ना. ज. पाऊलबुद्धे आयुर्वेद महाविद्यालय, अहिल्यानगर) – रोख ₹२,१००

खुला गट:

 प्रथम: अरविंद प्रेमनारायण महेश्वरी – रोख ₹११,०००

 द्वितीय: गोरक्षनाथ रायभान नलगे – रोख ₹७,०००

 तृतीय: आकाश वंदना वसंत बोडखे – रोख ₹५,०००

 * उत्तेजनार्थ: लक्ष्मी प्रतीक जाधव आणि शुभांगी सुदाम खरमाळे – प्रत्येकी रोख ₹२,१००

(सर्व विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह, साई चरित्र ग्रंथ, शाल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.)

पारितोषिक वितरण व समारोप

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी भिमराज दराडे, शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विकास शिवगजे आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. डॉ. अनुप दळवी, प्रा. डॉ. संदीप तपासे, प्रा. डॉ. रावसाहेब दहे, प्रा. डॉ. गौरव पवार, प्रा. डॉ. रवींद्र जोशी आणि प्रा. डॉ. भाऊसाहेब नवले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल वाघ व प्राचार्य विकास शिवगजे यांनी केले, तर आभार प्राचार्य संतोष औताडे यांनी मानले. श्री साईबाबा वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाने या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!