अहिल्यानगर जिल्हापाथर्डी तालुकाप्रशासकीय

अहिल्यानगर जिल्ह्यात सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नितीन कंडारे पाथर्डीचे नवे पोलीस निरीक्षक

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

पाथर्डी — अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नितीन कंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी ३० सप्टेंबर रोजी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.

नितीन कंडारे यांची जिल्हा विशेष शाखेतून पाथर्डी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पाथर्डी पोलीस ठाण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांची पोलीस नियंत्रण कक्षातून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची पोलीस नियंत्रण कक्षातून जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक हमीद चांद शेख यांची पोलीस नियंत्रण कक्षातून एएचटीयूमध्ये, तर पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांची पोलीस नियंत्रण कक्षातून टीएमसीमध्ये बदली करण्यात आली आहे.

याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांची पारनेर पोलीस ठाण्यातून त्याच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या बदली व नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाथर्डी पोलीस ठाण्याची जबाबदारी नितीन कंडारे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने त्यांच्या कार्यपद्धतीकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!