आर्थिककृषी

सरकारने सोयाबीन कापूस हमी भावाने खरेदी करावे-विठ्ठलराव शेळके

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – सरकारने सोयाबीन कापूस हमी भावाने खरेदी करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

 

पत्रकात शेळके यांनी म्हटले आहे की यावर्षी संपुर्ण जिल्ह्यात व राज्यात अतीवृष्टी मुळे खरीप हंगामातील पिके उध्वस्त झाली अनेक शेतीतील उभे असलेले पिके पाण्याखाली गेले थोडेफार शेतकरी हे सोयाबीन कापूस यांचे उत्पादन एकरी दोन तिन किव्टंल मिळाले उत्पादनात जवळपास ८० टक्के घट झाली तरी देखील व्यापारी सोयाबीन ३५०० ते ४००० रुपये दराने खरेदी करत आहे तसेच कापूस ४००० ते ४५०० रुपये दराने खरेदी करत आहे.

 

आज शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शेतातील पिके काढणीसाठी एकरी ६ हजार ते ७००० मजूरी देण्यासाठी विक्री साठी माके॔टवर पाठवत आहे व्यापारी आधारभूत किमतीपैक्षा १००० ते १५०० रुपये कमी दराने खरेदी करत आहे जिल्ह्यातील माके॔ट कमेटीचे व्यवस्थापन यांचे संगनमताने व्यवहार चालू आहे यात शेतकऱ्यांची लूट केली जात आहे तरी सरकारने जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा या प्रश्र्नावर शेतकरी संघटना व शेतकरी आंदोलन करतील असे विठ्ठलराव शेळके यांनी म्हटले आहे

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!