
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – ग्रामीण भागातील लपलेले कला गुण उजागर करण्यासाठी राहाता येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सव विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची देत आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणी असतात, परंतु त्यांना योग्य व्यासपीठाची गरज असते. या महोत्सवामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळून भविष्यातील उत्तम कलाकार घडतील.असे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूट कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित राहाता सांस्कृतिक महोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात.विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी सौ.विखे पाटील म्हणाल्या, मंदिर प्रांगणात सुरु असलेल्या या महोत्सवात दररोज पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग हे या महोत्सवाचे यश आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावतो तसेच इतरही विद्यार्थ्यानाही प्रेरणा मिळते. नागरिकांचाही या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळतो हि समाधानाची बाब आहे.या महोत्सवातून भविष्यात चांगले कलाकार घडतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या महोत्सवामध्ये देशभक्तीपर गीत, सहकार, सामाजिक प्रबोधन, पोवाडा, लोककला, लोकगीत इत्यादी कलाविष्कार सादर होत आहे.
भव्य मंडप व स्टेज, लाईट डेकोरेशन, वाद्यवृंद यांच्या समवेत विद्यार्थी कलाकार जुन्या व नव्या गीतावर थिरकत आहेत. तसेच विविध सामाजिक संदेश देत आहेत. प्रेक्षकही उस्फुर्त दाद देत आहेत. तसेच उत्तम सूत्र संचालन यामुळे महोत्सव लोकप्रिय झाला आहे. या प्रसंगी सौ. धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते भव्य लकी ड्रॉ ची सोडत काढून ०८ भाग्यवंतांना पक्षीसे वाटण्यात आली. तसेच संस्थेच्या डायरेक्टर सौ. धनश्रीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले. भाग्यवान पाच विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी सायकल हे बक्षीस देण्यात आले. तसेच विविधता मधील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. याप्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ. प्रदीप दिघे, मुख्याध्यापक सुधीर जोशी , कैलास सदाफळ, परीक्षक गागरे सर, गागरे मॅडम,सीमा लोगांनी , आनंद राशिनकर, गोकुळ जंगले, तुषार सोमवंशी ,दशरथ तुपे, किरण वाबळे, प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप, प्राचार्य कमलाकर कसबे,प्राचार्य किशोर निर्मळ, प्राचार्य नारायण गुळवे, सांस्कृतिक महोत्सव समन्वयक डॉ. सत्यजित पोतदार तसेच ग्रामस्थ ,विद्यार्थी, प्राध्यापक, प्रध्यापकेतर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




