कोपरगावकोपरगाव तालुकाबालविवाह प्रतिबंधसामाजिकस्नेहालय संस्था अहिल्यानगर

राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात स्नेहालय उडान प्रकल्पाचे बालविवाह प्रतिबंधक जागृती व्याख्यान

(अहिल्यानगर खबरबात वृत्तसेवा)

 

कोपरगाव – तालुक्यातील डाऊच.बु येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि के.जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर ‘Youth for My Bharat’ व ‘Youth for Digital Literacy’ या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आले.

 

शिबिराचा मुख्य आकर्षण ठरलेले स्नेहालयच्या उडान प्रकल्पाच्या वतीने आयोजित बालविवाह प्रतिबंधक जागृती व्याख्यान दिनांक ६ जानेवारी रोजी पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रवीण कदम यांनी उपस्थित तरुणाईशी संवाद साधत बालविवाह प्रतिबंधक कायदा, POCSO कायदा, बालकांचे अधिकार, भारतातील बालविवाहाचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, सायबर गुन्हे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक केले. तसेच, तरुणांनी ध्येय निश्चिती व करिअर मार्गदर्शनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. त्यांच्या प्रेरक शब्दांमुळे तरुणांनी बालविवाहास नकार देण्याची प्रतिज्ञा घेतली.

 

कार्यक्रमात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त योग प्रशिक्षक प्रज्वल ढाकणे यांनी तरुणांना योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवत तरुणाईमध्ये योगाभ्यासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला.कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. रोहिदास भडकवाड,प्रा.डॉ.संजय दवंगे, प्रा. डॉ.एस.बी.भिंगारदिवे, प्रा.डॉ.बी.एस.गायकवाड,तसेच उडान प्रकल्पाचे शाहिद शेख, विकास सुतार, विवेक कर्डिले, आकाश पांडुळे यांच्यासह १०० हून अधिक तरुण-तरुणी उत्साहाने उपस्थित होते.

 

 

 

 

हे व्याख्यान तरुण पिढीला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत, त्यांच्या आरोग्यविषयक व कायदेशीर जागरूकतेसाठी महत्त्वाचे ठरले. या शिबिराच्या माध्यमातून ‘Youth for My Bharat’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जाहिरात

 

 

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!